हडपसर : मांजरी फाटा येथे 113 वाहन चालकांवर गुन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असूनही कामाशिवाय फिरणाऱ्या 73, तर आज (बुधवार) 53 अशा एकूण 113 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार 87 वाहनचालकांवर केसेस दाखल केल्या आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौक येथे हडपसर वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. 6 मे) 53 वाहनांवर कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.

कोळी म्हणाले की, मागिल दोन दिवसांत भादंवि 188, 269, 270, 271 याप्रमाणे चारचाकी-11, तीनचाकी-6 आणि दुचाकी 56 अशा एकूण 73 वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभर लॉकडाऊन असून, रेडझोनमध्ये डबल, ट्रिपल सीट फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी कडक करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव म्हेत्रे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, सुनील बोरकर, अंकुश शिवणकर, तेज भोसले, मनोज ठाकरे, दिनेश टपके, रामदास चिंचकर, अतुल साळवे, सचिन लांडगे, कैलास सपकाळ, शरद पाटील, संतोष कदम, संतोष आढाव आणि महिला पोलीस नाईक सुजाता कुंजीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.