नंबर प्लेटला पिवळा रंग फासून रिक्षाचा चोरीसाठी वापर; चौघांना अटक

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन –  ऑटो रिक्षाच्या (Auto rickshaw) नंबर प्लेटवर पिवळा रंग फासून रिक्षातून रात्रीच्या वेळी चोरी करण्यास बाहेर पडणा-या चौघा चोरट्यांना कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजित बहिरे आणि एक अल्पवयीन तरुण अशी आरोपींची नाव आहेत. अल्पवयीन चोरट्यास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अन्य तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेली माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाची चोरी झाली होती. दुकानातून महागडी वायर चोरीस गेल्या होत्या. रात्रीच्या वेळेस स्टेशन परिसराला लागून या मार्केटमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, रात्रीच्या वेळी एक रिक्षा फिरते. तिच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग फासला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू करून त्याला ताब्यात घेतले. जी माहिती समोर आली, ती धक्कादायक होती. रिक्षा चालकासह रिक्षात प्रवासी म्हणून बसणारे दुसरे कोणी नाही तर चोर होते. रात्रीच्या वेळी चोरीचे काम करीत होते.

विशेष म्हणजे याच चार जणांनी मिळून ग्राइंडर मशिनच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले होते. त्यांच्याकडून तब्बल सव्वा दोन लाखांचा चोरीस गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधिकारी दीपक सर्योदय यांनी दिली आहे.

You might also like