Homeक्राईम स्टोरीमुंडेंनी Video बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला...

मुंडेंनी Video बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण…

पोलीसनामा ऑनलाईनः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( dhananjay munde) यांच्यावर गायिका रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंडेवर (dhananjay munde)  आरोप करणा-या तरुणीचा शनिवारी डी.एन. नगर पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतला. सहायक पोलीस आयुक्त जोत्सना रासम यांनी हा जबाब घेतला. सुमारे साडेपाच तास शर्माची चौकशी करण्यात आली. मुंडे यांनी आपला व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध स्थापित केले, त्याबाबत आपण बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंडे यांनी दबाव टाकून दिशाभूल केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाने त्यांच्यावर मोठ राजकीय संकट ओढवल होत. परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत 2010 सदर तरुणी सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. हेगडे आणि धुरी यांनी रेणू शर्मावर केलेल्या आरोपामुळे मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळले आहे. त्यामुळे मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे.

मुंडेच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राजव्यापी आंदोलन
बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे. पवारांकडून ही भूमिका अपेक्षित नव्हती, असे सांगत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून सोमवारपासून (दि. 18) भाजपाच्या महिला आघाडीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News