त्याने जीव देणार असल्याचे स्टेटस टाकले, त्या आयपीएस अधिकाऱ्याने पाहिले, पुढे झाले असे काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आत्महत्या करत असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर एका तरुणाने पोस्ट केला. ही बाब राज्याच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अवघ्या ३० मिनीटात त्याला शोधून आत्महत्येपासून परावृत्त केले. दरम्यान पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचे प्राण वाचले.

पोलीस महानिरीक्षकांनी दिली माहिती

पुण्याच्या हडपसर परिसरातील एक तरुण आत्महत्या करत असल्याचं स्टेटस त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले. सायबर गुन्हे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांना याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला दिली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि पथकाने तातडीने सोशल मिडीयावरून त्या व्यक्तीची माहिती मिळवली. त्यानंतर तो व्यक्ती हडपसर भागातील असल्याचे समोर आल्यावर याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना देण्यात आली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याचे घर शोधून काढले.

पोलिसांनी शोधून केले परावृत्त

हडपसर पोलिसांचे पथक तात्काळ त्या तरुणाच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्याचे समुपदेशन केले. त्यासोबतच वरिष्ठ अधिकारीही तेथे दाखल झाले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी केली.

यामुळे तो करत होता आत्महत्या

संबंधित तरुणाचे लग्न झालेले आहे. तो एमपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्यात आला होता. मात्र पुण्यात आल्यावर कौटुंबिक भार सांभाळण्यासाठी त्याला नोकरी स्विकारावी लागली. तो पुण्यात कॅब चालवत होता. परंतु एमपीएससी परीक्षेत यश मिळत नाही. नोकरी आणि इतर बाबींमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या करत असल्याचे स्टेटस सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like