उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून युध्दपातळीवर शोध सूरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा पोलीस शोध घेत असून, सेंट्रल बिल्डिंगजवळील एका नारळ पाणी विक्रेत्याकडे ते नारळ पाणी पिले आणि तेथून पाई चालत गेल्याचे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पुढील भागात सीसीटीव्ही नसल्याने ते नेमके कुठे गेले हे समजत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी जवळपास पुण्यातील दीडशेच्या जवळपास सीसीटीव्ही चेक केले आहेत. पण ते एकाच ठिकाणी दिसले आहेत. त्यांनी सेंट्रल बिल्डिंग भागात एका नारळ विक्रेत्याकडे नारळ पाणी पिल्याचे दिसून येत आहे. बेपत्ता होताना त्यांनी घरून 50 हजार रुपये घेतले होते. तर तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आर्थिक नुकसान आणि नैराश्य यातून घर सोडल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, तपास सुरू असून, आमच्या कडे मिसिंग दाखल आहे. अद्याप कुटुंबाकडून तक्रार आलेली नाही. मात्र त्यांनी काही व्यक्तींची नावे घेतली आहेत. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. जवळपास 13 ते 14 जणांकडे चौकशी केली आहे. त्यात बहुतांश व्यक्तीकडून पाषाणकर यांनी उसने पैसे घेतलेले आहेत. यातील काहींचे पैसे निम्मे दिले देखील असून, तर काहींना महिन्याला हप्त्यानुसार पैसे देणे ठरलेले आहे. कुटुंबाने आम्हाला दिलेल्या सुसाईड नोटमध्ये व्यवसाय बाबत लिहिले असून, याला मी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यात कोणत्या व्यक्तीचा समावेश नाही, असे ही पोलिसांनी सांगितले आहे.