धुळे : गणेश विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ; CCTV आणि Drone कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार लक्ष

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बारा दिवस विधिवत पुजन केलेल्या गणेशमुर्तीचे उद्या थाटामाटात कार्यकर्ते विसर्जन करणार यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीसांचा बंदोवस्त मोठ्या प्रमाणात तैनात राहणार आहे. वाहतुकीसाठी बदल करण्यात आले आहे. अवजड वाहनास गावात बंदी करण्यात आली आहे.

मालेगाव रोड श्री छञपती शिवाजी महाराज पुतळा पासुन ते थेट गांधी चौक पुतळ्यापर्यंत हा जुना आग्रारोड मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी राहणार आहे. ह्या मार्गावर मिरवणुका रांगेत लागत पारंपारीक वाद्य ढोल-ताशांच्या गजरात वाजत नाचत लाडक्या बाप्पाला गणेश मंडळ निरोप देतील. पांझरा नदी किनारी, देवपुरात हत्ती डोहात गणेश मुर्ती विसर्जन करण्यात येईल. येथे निर्माल्य संकलनासाठी हौद ठेवण्यात आले आहे. हत्तीडोहात पाण्यात कोणी बुडला तर त्याला बाहेर काढण्यासाठी लागणारे साहित्य व नागरीकांच्या मदतीसाठी पोलीस छावणी तैनात करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मार्गासाठी तिसरा डोळा पोलीसांची मदत करणार
शहरात पाचकंदिल चौक, घड्याळवाली मशीद, शहरचौकी, सराफ चौक, कराचीवाला चौक, गांधी चौकात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

पोलीस बंदोबस्त माहिती
1 जिल्हा पोलीस अधिक्षक
1 अप्पर पोलीस अधिकारी
9 पोलीस निरिक्षक
40 सहाय्यक उपनिरीक्षक
488 पुरुष पोलीस कर्मचारी
255 होमगार्ड
88 प्रशिक्षणार्थी पोलीस
1 दंगा काबु पथक
1 एस आर पी प्लाटुन
एकुण 124 गणेश मंडळ मुर्तीचे विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोवस्त शहारात तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली.

 

 

You might also like