पिंपरी : अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या 6 जणांना अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या सहा जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.8) बावधन येथून अटक केली. कारवाईत त्यांच्याकडून चरस, गांजासह एकूण 4 लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

प्रशांत अनिल माळी (वय 30), तेजस पुनमचंद डांगी (वय 26), सुजित गोरख दगडे (वय 23), राहूल कवडे, समीर शेख (सर्व रा. मुळशी), ओमकार राजेंद्र नगरकर (वय 22, रा. पुणे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक राजेंद्र महाडिक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माळी आणि नगरकर यांच्या ताब्यातील दुचाकीमधून 298 ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस हस्तगत केला आहे. तर डांगी आणि दगडे यांच्या ताब्यातून 12 किलो 434 गांजा इलेक्ट्रॉनिक छोटा वजनकाटा, गांजा पॅकिंग मशिन आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. तर समीर शेख आणि कवडे यांच्या खोलीतून एक किलो 428 ग्रॅम गांजा आणि 9 ग्रॅम चरस असा एकूण चार लाख 29 हजार 750 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.