पोलीसांकडून २५ लाखाचे २०१ मोबाईल हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेली सहा महिन्यात गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले २५ लाख रुपये किंमतीचे तब्बल २०१ मोबाईल आज मूळ मालकांना हस्तांतर करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी स्वतः हे मोबाईल मालकांना दिले यामुळे नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण होते.

अनेकदा मोबाइल गहाळ झाला, चोरीला गेला तर तो परत मिळेल याची आशा अजिबात नसते. नागरिकही मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेल्यानंतर तक्रार देऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र तोच मोबाइल परत मिळणार हे समजल्यानंतर आनंद खूप होतो. वाकड पोलिसांनी मोबाईल मिळणारच नाही हा नागरिकांचा समज दूर केला आहे. आज सुमारे २०१ मोबाईल हस्तांतर करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस निरीक्षक सतीश माने, तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने उपस्थित होते.

पोलिस आयुक्तालयात मूळ मालकांना मोबाईल हस्तांतर करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी ज्यांना मोबाईल परत मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यापूर्वीही वाकड पोलिसांनी १०० हुन अधिक मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत.

ही कामगिरी निरीक्षक सतीश माने, सुनिल पिंजण, उपनिरीक्षक हरिष माने, कर्मचारी श्याम बाबा, बिभीषण कण्हेरकर, सणस, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, भौरोबा यादव, विजय गंभिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितिन गेंगजे, दीपक भोसले, मधुकर चव्हाण, नूतन कोंडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.