पोलीसांकडून ३२ लाख ८५ हजाराची रोकड सोलापुरातून जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना सोलापूर पोलीसांकडून  भरारी पथके  तयार  करण्यात आली असून  विविध ठिकाणी नाकाबंदी  वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. पोलीसांच्या कारवाईत आत्तापर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. दरम्यान या कारवाईत पोलीसांकडून ३२ लाख ८५ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे.

प्रचारासाठी वाहनाची परवानगी न घेता त्याचा गैरवापर करणे,  विविध राजकीय पक्षाचे झंडे, नेत्याचे फोटो  वाहनावर लावणे, प्रचार  करणे , वाहनात योग्य कारणशिवाय रोकड ठेवणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत. जप्त करण्यात आलेल्या  रकमे बाबत तपास करण्यासाठी  जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत कऱण्यात आली आहे.  तचेच परवानगी न घेता सभाचे  आयोजन,  ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन,   अशा स्वरूपाचे  गुन्हे दाखल करण्यात आले  आहेत.