पिंपरी : सराईत चोरट्यांकडून साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाठलाग करुन अटक केलेल्या सराईत सोनसाखळी चोरट्याकडून गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. समीर श्रीकांत नात्रजकर (४६, रा. खंडोबा मंदिराजवळ, भोसरी) याला अटक केली आहे.

Police

सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर.आर. पाटील, श्रीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार; हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस पथक गस्त घालत होते. त्यावेळी भोसरी येथील रोशल गार्डन हॉटेल शेजारी सोनसाखळी चोरटा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, आप्पा लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, मनोज कमले, अंजनराव सोडगिर, मारुती जायभाये, सचिन मोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने सापळा रचून समीर याला अटक केली.

त्याच्याकडून चौकशी करुन सोनसाखळी चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये आठ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचे २३१ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. याच्याकडून हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. यापूर्वी त्याच्यावर वाहन चोरी, आर्म अ‍ॅक्ट यासारखे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. समीर याने बनावट नावाचे आधार कार्ड तयार केले आहे.

Visit : policenama.com

You might also like