राजस्थानमध्ये खरेदी केलेली वाहने विना नोंदणी चालविणे पडले महागात, २ दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थानात खरेदी केलेल्या दुचाकी आरटीओ नोंदणी न करता त्या फिरवणे चांगलेच महागात पडले आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. एका तरुणाकडून जप्त केलेल्या दुचाकी आरटीओच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार प्रकाश लोखंडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिपंरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विना क्रमांकाची टिव्हीएस अपाचे दुचाकी आहे. एक तरुण त्यावर संशयितरित्या फिरत आहे.

त्यानुसार पोलिसांनी दुचाकीसह अझरुद्दीन अनारदिन साई (वय २०, रा. मासुळकर कॉलनी) तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ही दुचाकी २०१७ मध्ये खऱेदी केली. त्यानंतर तिचे कोणतेही रजिस्ट्रेशन केले नाही. दरम्यान त्याच्याकडे अशा प्रकारची एक स्कूटी पेप दुचाकीदेखील आहे. असे त्याने सांगितले. त्याने या दोन्ही दुचाकी जूलै २०१६- २०१७ मध्ये काकर मोटर्स नौखा बिकानेर येथून खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर या दोन्ही दुचाकी आरटीओकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस हवालदार प्रकाश लोखंडे. उमेश काटे, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like