‘या’ पध्दतीनं मतदान करण्यास रोखलं !

पोलिसनामा ऑनलाइन – नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आचारसंहिता भंग करणारा प्रकार घडला. येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली. जय ओबीसी लिहिलेली टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालून मतदान केंद्रात मतदानासाठी जाणाऱ्या एका उमेदवाराला भाजपा कार्यकर्त्यांनी रोखून धरलं .

दरम्यान, माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे सांगून टोपी घालून आत जाऊ नये अशी मागणी यावेळी केली. यावरून पोलिसांनी त्या मतदाराला ताब्यात घेतलं. यावेळी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर चांगलाच वाद झाला. अखेर पोलिसांनी येऊन हस्तक्षेप केला. त्या मतदाराला वेळीच ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याचे मतदान झालेले नव्हतं.

भंडाराचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना सांगितलं, की या प्रकाराला दुजोरा दिला आहे. त्या मतदाराला पोलीस ठाण्यात स्थानबद्द केलं आहे. तर तक्रारकर्ते महेंद्र निंबार्ते यांना दिलेली माहिती अशी, हा प्रकार म्हणजे सरळसरळ आचारसंहिता भंगाचा होय. त्यामुळे त्यांना रोखले. पोलीस व मतदान केंद्रापुढचं हा प्रकार घडल्याने आपण तक्रार दिली नाही.