१० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करु नये, म्हणून १० हजार रुपयांची लाख घेणाऱ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

सिद्धेश सुरेश शिंदे (वय ३२, रा. स्काय हाईट, नालासोपारा) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
वसई येथील एका ३७ वर्षाच्या व्यक्तीविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सिद्धेश शिंदे याच्याकडे होता. त्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक करु नये व जामीन मिळवून देण्यासाठी शिंदे याने त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची ३१ मे, १ जून व ३ जून रोजी पडताळणी केली. दोन्ही दिवशी सापळा लावण्यात आला होता. मात्र, त्यावेळी शिंदे हा त्या ठिकाणी आलाच नाही़ त्यानंतर ३ जून रोजी त्याने पैसे स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेताना शिंदे याला रंगहाथ पकडण्यात आले.