दहा हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन आरोपींविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पथकाने ही कारवाई केली. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांनी ४५ वर्षीय इसमाला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात या इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून सरकारी पंचासह फिर्यादीला पाठविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, रायटर शेंडे यांच्यासह एकास १० हजारांची लाच घेताना पकडले. पडताळणीदरम्यान फिर्यादीच्या शर्टाच्या समोरच्या खिशात मोबाईलवर रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आला.

यावेळी फिर्यादीला तू रेकॉर्डिंग करतोस काय? असे विचारून अंगाला हात लावून चाचपणी केली. तसेच तांत्रिक पुराव्याशी छेडछाड करून फिर्यादीस शिवीगाळ केली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोहेकाँ गजानन दामोदर यांनी केली.

नगरसेवक विषप्रयोगप्रकरणी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा 
सोलापूर : सोलापूरमधील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विष प्रयोगात संबंधीची कसून चौकशी वाळवी व गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात यावी आशा मागणीचा औचित्याचा मुद्दा विधान परिषदेत आमदार रामहरी रुपनवर यांनी दाखल केला आहे. या प्रश्नावर सुरू असलेल्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे तपासाअंती मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल मधून निष्पन्न झाले होते.

या विषप्रयोगाची पोलिसात नोंद झाली होती या प्रकरणात पोलिसांकडून कोणत्याही प्रकारच्या तपासाच्या हालचाली होत नसल्याने सोलापुरात विरोधी पक्ष व धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आली. याप्रकरणी सुरेश पाटील यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात महापौर शोभा बनशेट्टी त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी भाजपा शहराध्यक्ष अशोक निंबर्गी राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि भाजपा नगरसेवक सुनील कामाटी यांच्या विरोध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात अनेकांचे जाब जबाब घेण्यात आले आहेत. मात्र, गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.