धक्‍कादायक ! लाच रक्‍कमेसह पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी फरार

गंगाखेड (परभणी) : पोलीसनामा ऑनलाइन – जेसीबी मशिनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपायांची लाच पोलीस उपनिरीक्षकाने स्विकारली. मात्र, अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचल्याची चाहूल लागताच पोलीस उपनिरीक्षकाने आणि त्याचा साथिदार पोलीस शिपायाने लाचेच्या रक्कमेसह पलायन केले. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) सायंकाळी घडला. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशीरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गिते आणि पोलीस शिपाई भालेराव असे फरार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. गिते आणि भालेराव हे दोघे सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्य़रत आहेत. सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदा सुरु असलेल्या वाळू उपशावरील जेसीबीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गिते आणि पोलीस शिपाई भालेराव यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपायांची लाच मागितली. लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परळी रस्त्यावर सापळा रचला.

तक्रारदाराकडून लाच स्विकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गिते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचल्याचे समजले. आपण पकडले जाऊ नये यासाठी गिते आणि भालेराव यांनी लाचेची रक्कम घेऊन तेथून फरार झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गिते आणि भालेराव विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

ही कारवाई विभागाचे पोलीस उपाधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, जमादार हनुमंते, पोलीस नाईक अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे, बोके यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?