तपासासाठी लखनौ येथे गेलेल्या गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नेपाळ येथे तपासासाठी गेलेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ मधील पोलीस उपनिरीक्षक अजय राजाराम म्हेत्रे यांचे लखनौजवळ हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका नेपाळी नोकराने केलेल्या चोरीच्या युनिट ३ समांतर तपास करीत होते. आरोपी नेपाळमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक अजय म्हेत्रे व त्यांचे सहकारी तातडीने गेल्या आठवड्यात नेपाळला गेले होते. त्याच्याबरोबरचे काही कर्मचारी नुकतेच परत आले होते. अजय म्हेत्रे व त्यांच्याबरोबर आणखी एक कर्मचारी होता. ते परत येत असताना रेल्वे चुकल्याने ते बसने येत होते. लखनौ जवळ बस आली असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Loading...
You might also like