कामाच्या तणावातून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामाच्या तणावातून ठाण्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान वर्तकनगर भागात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धनाजी सखाराम राऊत (वय-35) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

धनाजी राऊत हे अंधेरी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात कर्यरत होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी रेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानावर गेले होते. त्याठिकाणी त्यांनी एका झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नऊच्या सुमारास राऊत हे लटकलेल्या अवस्थेत नागिराकांना आढळून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

धनाजी राऊत यांच्या पश्चात पत्नी वनिता आणि दोन मुले असा परिवार आहे. धनाजी राऊत यांनी कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Visit : policenama.com 

You might also like