लाच प्रकरणात ‘ते’ पोलीस उपनिरीक्षक सेवेतून निलंबीत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाच घेताना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचे सेवेतून निलंबन करण्यात आले आहे.

कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान २४ जानेवारी रोजी सायंकाळी तक्रारदार यांच्या कडून वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडजोडीअंती रोख रक्कम लाच घेताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कुरकुटे यांना अटक केली होती. या कारवाई नंतर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचे सेवेतून निलंबन केल्याचे आदेश मंगळवारी काढले आहेत.