Maharashta : 40 बेपत्ता तबलिगींना शोधण्यात पोलिसांना यश, 18 जणांचा शोध अद्याप सुरू

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलिगी समाजच्या मरकज मुख्यालयातील कार्यक्रमामुळे देशातील कोरोना संसर्गित रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याच मोठं आव्हान सरकार आणि प्रशासमोर होत. दरम्यान, महाराष्ट्रातील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ५८ सदस्यांपैकी ४० जणांची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

अनिल देशमुख म्हणाले की, हे ५८ सदस्य गेल्या महिन्यात निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमास सहभागी झाले होते. यापैकी अनेकांनी आपला मोबाइल बंद ठेवला होता. त्यामुळे यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी यापैकी ४० सदस्यांना विविध क्लुप्त्या लढवीत शोधून काढले. तर १८ सदस्य अजूनही मोबाइल बंद करून बेपत्ता असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे.

सापडलेल्या ४० सदस्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे व आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार या सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. ‘ते सर्व भारतीय आहे. आम्ही त्यांना क्वारंटाइन ठेवण्याचा आदेश जारी केला असून जर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर प्रक्रिया करून त्यांना सोडण्यात येईल. तसेच राज्यातील पोलिसांनी यापूर्वी १५६ परदेशी नागिरकांना ताब्यात घेतले आहे. हे नागरिक दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यावर कार्यवाही करत व्हिसाचा दुरुपयोग व अन्य गुन्हांचे आरोप लावण्यात आले आहे.