Police Suicide News | तरूण पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

रायगड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अलिबाग (alibaug) येथील तरूण पोलिसानं बुधवारी सकाळी आत्महत्या (Police Suicide News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसानं आत्महत्या केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मृतदेह अलिबाग जिल्हा सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी करण्यात आला. police suicide news | police commits suicide hanging alibaug

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रशांत जगजीवन ठाकूर (34) असे आत्महत्या करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई आणि वडिल असा परिवार आहे. प्रशांत ठाकूर यांनी अलिबागमधील शिवाजीनगर (alibaug Shivajinagar) येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नित्याप्रमाणे प्रशांत ठाकूर हे डयुटीवर आले नाहीत म्हणून त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेक वेळा रिंग वाजून देखील त्यांनी फोन उचलला नाही. सहकार्‍यांनी तात्काळ प्रशांत ठाकुर यांचे घर गाठले. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अद्याप तरी प्रशांत यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिस (alibaug police) करीत आहेत.

Web Title : police suicide news | police commits suicide hanging alibaug

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police News । RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचे 9 ‘फॉलोअर्स’ पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

Rupali Chakankar । ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’; ‘या’ दांपत्याला राष्ट्रवादीचा खोचक टोला 

Pune Crime News | ‘या’ मोठया आर्थिक घोटाळयात पहिल्यांदाच भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदाराचं आलं प्रकाशझोतात, पुणे पोलिस घेताहेत युध्दपातळीवर शोध