Police Suicide | पुण्यातील एसआरपीएफच्या पोलीस जवानाने एसएलआरतून गोळी झाडून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suicide | पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF, Pune) च्या जवानाने आपल्याकडील एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारुन आत्महत्या (Suicide) केली. पुष्कर शिंदे Pushkar Shinde (वय ३६, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. (Police Suicide)

पुष्कर शिंदे हे एसआरपीएफ गट क्रमांक २ च्या प्लाटून नं. १ मध्ये कार्यरत होते. मंत्रालय मेन गेट येथे बंदोबस्तासाठी असलेल्या स्ट्रायकिंग क्रमांक ३ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिंदे हे मुळचे रत्नागिरीचे असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी शिंदे हे सुट्टीवरुन कामावर हजर झाले होते.  सोमवारी रात्रपाळी केल्यानंतर मंगळवारी सकाळी प्लाटून डोंगरी येथील पालिका शाळेत विश्रांतीला आली होती. शिंदे हे सकाळी ८ ते १० यावेळेत गाडीवर गार्डसाठी तैनात होते. सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांवरच शिंदे यांनी आपल्याकडील एसएलआर रायफलमधून मानेखाली गोळी मारुन घेतली (Police Suicide). अचानक झालेल्या गोळीच्या आवाजाने त्यांचे सहकारी धावत बसजवळ आले. तेव्हा शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी शिंदे यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले. परंतु, तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शिंदे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

Web Title :  Police Suicide | SRPF Pune Police Pushkar Shinde Suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या