औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- वाशीमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील यांच्यासह राज्यातील 3 आयपीएस अधिकार्‍याच्या आणि एका पोलिस उपायुक्‍ताची बदली आज (बुधवारी) करण्यात आली आहे.

बदल्या झालेल्या इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

आयपीएस आरती सिंग (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), आयपीएस वसंत परदेशी (पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, औरंगाबाद ते पोलीस अधीक्षक, वाशीम) आणि पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम (पोलीस उपायुक्‍त, नागपूर शहर ते पोलीस उपायुक्‍त, पुणे शहर). वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना मोक्षदा पाटील यांनी पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. आता त्यांची औरंगाबाद ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्‍त (DCP) संभाजी कदम यांची पुण्यात बदली