पोलीस अधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन

पालघर जिल्ह्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या जुगार आड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. तर जुगार खेळणाऱ्या ६४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.२) मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कृष्णा रिसॉर्टमध्ये करण्यात आली.
[amazon_link asins=’B01E6QH5T2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’509f88ae-af7f-11e8-8337-c17b34ccc3ae’]

पालघर पोलीस अधीक्षक यांना बातमीदारामार्फत मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कृष्णा रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कृष्णा रिसॉर्टवर छापा टाकला असता रीसॉर्टच्या हॉलमध्ये जुगार सुरु असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने जुगार खेळणाऱ्या ६४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

जाहिरात

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ८ लाख ६३ हजार २५० रुपयांची रोख रक्कम, ४ लाख ८९ हजार ३०० रुपयांचे ४८ मोबाईल, १ कोटी ५० लाख रुपयांची वाहने असा एकूण १ कोटी ६३ लाख ५२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास वालीव पोलीस करीत आहेत.

जाहिरात