home page top 1

पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात दलात खळबळ

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सुरेंद्र यांनी पोलीस वसाहतीमध्ये रविवारी रात्री सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरेंद्र हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून माढा पोलीस ठाण्यात मे महिन्यामध्ये रुजू झाले होते. रविवारी रात्री त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांसह बाहेर बसले होते. त्यावेळी सुरेंद्र घरामध्ये एकटेच होते. दरम्यान त्यांनी हॉलमधील सिलिंग फॅनला गळफास घेतला. वसाहतीमध्ये राहणाऱ्या महिलांनी सुरेंद्र हे लटकत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या पत्नीने माढा पोलिसांना दिली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात 3 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरून 12 सप्टेंबरला पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे वाद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास माढा पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like