Police Suspended | 6 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन ! 40 लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police, Amravati) चंद्रकिशोर मीणा (Chandrakishore Meena) यांच्या विशेष पथकाने (Special Squad) शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जुने शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजाराजवळच्या ट्रकमधून गुटख्याचा माल उतरवित असताना, छापा घालून 40 लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त (Gutkha Confiscation) केला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (SP G. Sridhar) यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलीस ठाण्यातील (Old City Police Station) तपास पथकातील (DB Team) सहा जणांना निलंबित (Police Suspended) केले आहे. सहा पोलिसांच्या निलंबनाचे (Police Suspended) आदेश सोमवारी (दि.6) काढले.

 

जुने शहरातील किराणा बाजारपेठेत गुटख्याची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली होती. त्या आधारावर त्यांच्या पथकाने ट्रकमधून 40 लाखांचा गुटखा उतरताना जप्त केला.
यावेळी आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी
जुने शहर पोलीस ठाण्यातील सहा जणांना निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे.

यासोबतच जुने शहर ठाणेदारांचा देखील कसुरी अहवाल विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे (Divisional Inquiry Officer) पाठविला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) पोलीस,
विशेष पथकांनी कामात कसूर केल्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एलसीबी प्रमुख (LCB),
विशेष पथक प्रमुखांचाही कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.
या कारवाईमुळे अकोला पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Police Suspended | gutkha storage neglected six policemen suspended akola grocery market

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा