Police Suspended | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, पोलिस उपनिरीक्षकासह सह तिघे पोलीस कर्मचारी निलंबित

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suspended | काही दिवसापूर्वी नागपूर (Nagpur) येथील पारडी पोलीस स्टेशन (Pardi Station) हद्दीत पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर या युवकाचा मृत्यू (Death) झाला. या प्रकरणी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (nagpur police commissioner amitesh kumar) यांनी संबंधित पोलिसांना निलंबित (Police Suspended) केलं आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी देखील या मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. तर, स्वतः आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षकांसह 3 पोलिसांवर निलंबनाची (Police Suspended) कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 7 जुलैच्या रात्री घडली होती. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. मात्र, आता पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मास्क न घातल्यामुळे 3 पोलिसांनी मनोज ठवकर या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर (Manoj Thawkar) मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडून सुरूय. दरम्यान, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopade) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेटून कारवाईची मागणी देखील केली होती. या दरम्यान, मनोजच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यावेळी रुग्णालयाभोवती जमावांचा तणाव निर्माण झाला होता.

प्रकरण काय ?

मनोज ठवकर (Manoj Thawkar) (वय, 35) हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात 7 जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडे आठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, परंतु, वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली. दरम्यान, मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो.
त्यानंतर PSI मुकेश ढोबळे यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे.
नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले.
पण बेशुद्ध झालेल्या मनोजला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं.

Web Title :  Police Suspended | nagpur man manoj thawkar beaten up by police psi and three others suspended

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update :
महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी