Police Suspended | अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणारा पोलीस कर्मचारी निलंबीत

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – अश्लील व्हिडिओ कॉल (Pornographic Video Calls) करुन खंडणी (Ransom) उकळणाऱ्या एक महिलेसह एका पोलीस कर्मचाऱ्याला तसेच एका तथाकथित पत्रकाराला नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक (Arrest) केली आहे आहेत. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात (Shahada Police Station) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचारी छोटुलाल तुमडु शिरसाठ Chhotu Tumdu Shirsath (वय-46) याला निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी निलंबनाचे (Police Suspended) आदेश काढले आहे.

 

शहादा पोलीस ठाण्यात IPC 384, 385, 389, 363, 323, 504, 506, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (Information Technology Act) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी छोटु तुमडु शिरसाठ, तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) Journalist Atul Ramakrishna Thorat (वय-50 रा. दत्त कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार) आणि अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या महिलेला 31 मे रोजी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. (Police Suspended)

 

पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची व त्यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (IPS PR Patil) यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना केली होती. तरी देखील नंदुरबार पोलीस मुख्यालयात (Nandurbar Police Headquarters) नेमणुकीस असलेल्या छोटुलाल शिरसाठ याचा महिला व तथाकथित पत्रकारासह गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent Of Police PR Patil) यांनी शिरसाठ याला तात्काळ प्रभावाने पोलीस खात्यातून निलंबित केले आहे.

Web Title :- Police Suspended | Nandurbar Police constable suspended for making pornographic video calls for ransom


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा