Police Suspended | हवालाच्या नोटा घेऊन जाणाऱ्या कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढणे पडले महागात, पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन – हवालाचे पैसे (Hawala Money) घेऊन जाणाऱ्या कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढणे एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) चांगलेच महागात पडले आहे. शहर पोलीस ठाण्यात (City Police Station) कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल गजानन हिवाळे (Gajanan Hiwale) यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबित (Police Suspended) केले आहे. याप्रकरणी साक्ष आणि चौकशीअंती हिवाळे यांचे निलंबन (Police Suspended) करण्यात आले.

 

दोन अडीच महिन्यापूर्वी अकोला येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये पैसे असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक पथकाला (Addl SP Squad) मिळाली होती. या माहितीवरुन शहर पोलिसांनी ही गाडी नांदुरा रोडवर पाठलाग करुन पकडली होती. कारमध्ये 65 लाख रुपये होते. कारमध्ये चालकासह आणखी दोन जण बसले होते. मागील सीटमधून पोलिसांनी 65 लाख रुपये जप्त केले. त्याचवेळी चालकाने दिलेल्या साक्षीनुसार, आपल्या खिशातूनही एक लाख रुपये पोलीस कर्मचाऱ्याने काढल्याचे सांगितले.

 

साक्षीदाराने पैसे काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया (SP Arvind Chawria) यांनी केलेल्या चौकशी पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे यांचे नाव समोर आले. त्यामुळे हिवाळे यांना सोमवारी (दि.3) एका आदेशान्वये निलंबीत केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्ह्यातील सुत्रधार सुटला
चालकाच्या खिशातून पैसे काढण्याचा बेत दोघांनी आखला होता. वरिष्ठ सहकाऱ्याच्या इशाऱ्यावरुन हिवाळे यांनी पैसे काढले होते.
घटनेनंतर दोघांनी 50-50 ची वाटणी केली. परंतु चौकशीत सुत्रधार बाजूला राहिला.
दरम्यान, संशयाचा फायदा घेत हिवाळे यांना निलंबित (Police Suspended) केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

 

Web Title :- Police Suspended | one lakh rupees taken from car drivers pocket suspension of police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त