Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारमध्ये (Pimpri Chinchwad Crime Branch Unit 4) कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गोपनियतेचा भंग करुन आरोपीला मदत करुन महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे (Maharashtra Civil Service Act) उल्लंघन केल्याप्रकरणी सेवेतून निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 11) एका आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहेत. पोलीस नाईक लक्ष्मण नवाजी आढारी असे निलंबित (Police Suspended) करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

लक्ष्मण नवाजी आढारी (Laxman Nawazi Adhari) हे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारमध्ये कार्यरत आहेत.
कार्तव्यावर असताना आढारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) दाखल
असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अक्षय गोविंदा पाटील याला CDR रिपोर्ट काढून दिला.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो पाहिजे असलेला आरोपी आहे.
आरोपीने CDR रिपोर्ट वरून पोलीस कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे आदेशात म्हटले आहे.

लक्ष्मण आढारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यामधील नियमांचे उल्लंघन केले आहे.
त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
तसेच पोलीस खात्यास धोकादायक असलेले, गोपनियतेचा भंग करणारे आणि गुन्हेगारास प्रत्यक्ष
मदत करणारे बेजबाबदारपणाचे वर्तन केल्या प्रकरणी आढारी यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर सहायक पोलीस आयुक्त,
प्रशासन यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल,
असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : police suspended | pimpri policeman suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chehre | अमिताभ बच्चन यांनी सांगितली नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, आता ‘या’ तारखेला चित्रपटगृहांमध्ये उडणार धमाल

Anti Corruption Nagar | BHMS च्या विद्यार्थिनीकडून तब्बल 1.50 लाखाची लाच घेताना प्राचार्य, लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्याच्या कोंढवा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार, प्रकृती चिंताजनक