Police Suspended | विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 3 पोलिसांसह 1 होमगार्ड निलंबित

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suspended | सातारा जिल्ह्यातील (Satara District) खंडाळा तालुक्यातील (Khandala Taluka) शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील (Krantisinha Nana Patil Veterinary College Shirwal) विद्यार्थ्यांना (Student) पोलिसांनी अमानुष मारहाण (Police Beaten) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज गेटसमोर आंदोलन (Agitation) केले. या प्रकरणातील दोषी असलेल्या 3 पोलीस आणि एका होमगार्डला (Homeguard) निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या (Police Suspended) कारवाईमुळे सातारा पोलीस (Satara Police) दलात खळबळ उडाली आहे.

 

शिरवळ पोलीस ठाण्यातील (Shirwal Police Station) एन. डी. महांगरे (N. D. Mahangare), बी. सी. दिघे (B. C. Dighe), चालक धायगुडे (Driver Dhayagude) व होमगार्ड नरुटे (Homeguard Narute) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची (Police Suspended) नावे आहेत. हा प्रकार बुधवारी (दि.9) रात्री घडला होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीची घटना बुधवारी रात्री घडली आहे. विद्यार्थी आरडाओरडा करत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना (Shirwal Police) मिळाली. यानंतर निलंबित करण्यात आलेले चौघेजण विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर (Student Hostel) गेले. काहीही माहिती न घेता पोलिसांनी दिसेल त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरवाजे, कड्या तोडून खोलीत घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. हा गोंधळ तब्बल एक तास सुरु होता.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर याचे पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले. शुक्रवारी सकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांचा निषेध करत कॉलेजच्या गेटबाहेर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थांनी मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तर राज्यातील पाच इतर ठिकाणी असलेल्या पशु वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवत बंद पुकारला. याचवेळी सोशल मीडियात (Social Media) पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे फोटो व्हायरल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस दलातील संबंधित चौघांना तातडीने निलंबित करण्यात आले.

 

Web Title :- Police Suspended | students beaten in shirwal 3 satara policemen and Homeguard suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा