Police Suspended | पिंपरी चिंचवडमध्ये तीन पोलीस निलंबित, भंगारवाल्याकडून घेतले होते पैसे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पकडलेल्या भंगाराच्या गाडीवर कायदेशीर कारवाई (Legal Action) न करता पैसे घेऊन गाडी सोडणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde) यांनी निलंबित (Police Suspended) केले आहे. शुक्रवारी (दि.4) रात्री उशीरा तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे (Police Suspended) आदेश काढण्यात आले. हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला असून निलंबित तिन्ही पोलीस कर्मचारी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) कार्यरत होते.

ज्योतिराम झेंडे (Jyotiram Zende), विलास बोऱ्हाडे (Vilas Borhade), अशोक घुगे (Ashok Ghuge) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एक महिन्यापूर्वी तिघांनी भंगाराची गाडी पकडली होती. या गाडीवर कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडून दिली होती. पोलिसांनी कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तिघांना निलंबित (Police Suspended) केले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ज्योतिराम झेंडे, विलास बोऱ्हाडे, अशोक घुगे यांनी गंभीर स्वरुपाच्या गैरवर्तणूक प्रकरणी शिस्तभंग केला आहे.
त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title :- Police Suspended | three policemen suspended in pimpri chinchwad for taking money from scavengers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Salman Khan | मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सलमान खानने केलं कौतुक ; म्हणाला कि…

Sourav Ganguly | सौरभ गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात, कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका