वाळू वाहतूक करणार्‍या 3 वाहनांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई

थेऊर – पुणे सोलापूर महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणार्या तीन वाहनांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून तेरा ब्रास वाळू सह तीन वाहने जप्त केली असून त्याची अंदाजे किंमत रु 22 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर थेऊरफाटा येथे दोन वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून आले त्यावरील चालक राजु नागराज केंद्रे व केशव दिगंबर जाधव रा.गोकुळनगर ता.हवेली यांना ताब्यात घेतले त्याच्याकडे वाळू वाहतूक संदर्भात परवानगीची चौकशी केली असता त्यांच्याकडे काहीच माहिती मिळाली नाही यावर त्याच्याविरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा तसेच सार्वजनीक मालमत्ता विद्रूप कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही वाहनात मिळून एकुण आठ ब्रास वाळूसह दोन ट्रक (MH 11 – AL8599) व (MH14 – CP7255) ताब्यात घेतले.

तसेच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे एक हायवामध्ये अवैध वाळू वाहून नेताना चालकास ताब्यात घेतले या वाहनात एकुण पाच ब्रास वाळू असल्याचे दिसून आले या वाहनांचा चालक विलास विनायक लोखंडे व मालक वाल्मीक आखाडे रा. कासुर्डी ता. दौंड याच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा तसेच सार्वजनीक मालमत्ता विद्रूप कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले हायवा क्र.(MH -12 – QG 4979) यामध्ये वाळू सह वाहन जप्त केले असून याची अंदाजे किंमत रु सात लाख 40 हजार एवढी आहे.

या दोन्ही कारवाईत एकुण रु.22 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

You might also like