शहरातील अवैध दारू अड्यांवर पोलीसांचे छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा, विमानतळ तसेच चतुश्रृंगी परिसरात सुरू असणार्‍या गावठी दारूचे अड्डे गुन्हे शाखेने छापे टाकून उध्वस्त केले. येथून 40 लिटरची गावठी दारू तसेच त्यासाठी लागणारे रसायनही जप्तकरून ते नष्ट केले आहे. तर रात्रीउशीरापर्यंत सुरू असणार्‍या 7 हॉटेल्स व पबवर कारवाई केली आहे.

याप्रकरणी अवैधरित्या दारू अड्यावर छापा टाकून येरवडा पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरात नववर्षाच्या पाश्र्वभुमीवर गुन्हे शाखेकडून अवैधरित्या सुरु असलेल्या व्यवसायांची माहिती घेऊन त्यावर कारवाई केली जात आहे. रात्रीचे हॉटेल्स तसेच लॉज व इतर आस्थापनांची तपासणीही केली जात आहे. त्यानुसार येरवडा येथील लमाणतांडा येथे सुरू असणार्‍या तीन हातभट्टयावर छापा टाकण्यात आला. तर दुसर्‍या कारवाईत देशी आणि विदेशी दारुची विक्री करणार्‍या 5 जणांकडून 8 हजारांची दारु जप्त केली. रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि बार उघडे ठेउन व्यवसाय करणाछया सात ठिकाणी कारवाई केली.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, रमेश राठोड, अशोक शेलार, सरस्वती कांगणे, संध्या कांबळे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/