Pimpri : ‘अंदर बाहर’ जुगार खेळणार्‍यांना केले ‘अंदर’; कंपनीच्या आवारात जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पिंपरी : कंपनीच्या आवारात अंदर बाहर जुगार खेळणार्‍यांवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून १० जणांना अंदर केले आहे. भोसरी एमआयडीसी येथील टी ब्लॉकमधील प्रायमा इंजिनिअरींग इंडस्ट्रीज या कंपनीच्या आत पाठीमागील बाजूच्या मोकळ्या जागेत गुरुवारी सायंकाळी हे सर्व जण जुगार खेळत होते.

गणेश विष्णु मातंग (वय ३५) व रेहमान इस्माईल शेख (वय ३४, दोघे रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) हे दोघे जुगार चालक आहे. ईलियास मुसा पठाण (वय ३१, रा. तानाजीनगर, चिंचवड), प्रकाश बसवराज जमादार (वय २३, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी), निखिल अनिल पवार (वय २९, रा. वास्तु उद्योग कॉलनी, अजमेरा, पिंपरी), बाबासाहेब बाळ भोसले (वय २४), फिरोज फरदुल्ला शेख (वय ३४), अस्लम हनिफ चाकुरे (वय ३२, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी), सुनिल मारुती दळवी (वय ४६, रा. शिरगाव, ता़ मावळ) निलेश जनार्धन कटके (वय ४३, रा़ जयदीप सोसायटी, मोहननगर, चिंचवड) अशी जुगार खेळत असलेल्यांची नावे आहेत.

भोसरी एमआयडीसीतील प्रायमा इंडस्ट्रीज काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता छापा टाकला. त्यात ते अंदर बाहर हा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४७ हजार २६० रुपये व जुगार खेळण्यासाठी वापरलेले १०४ पत्यांची पाने जप्त करण्यात आली आहेत.