रांजणगाव पोलीसांकडून नियम न पाळणार्‍या 598 जणांवर कारवाई

शिक्रापुर : रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनांवर कारवाई करत तब्बल 598 वाहन चालकाकडून एक लाख 46 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कोरोना पादुर्भाव लक्षात घेता मास्क न घालने , वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनांवर व वाहनचालकांवर रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,पोलीस हवालदार-सहदेव ठुबे ,अनिल चव्हाण’,राजू वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री जाधव व पथकाने अशा वाहनांवर कारवाई करून 598 वाहनांवर ऑनलाईन कारवाई करून एक लाख 46 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर या भागात वाहतूक करणारे रिक्षा यांनी वाहतुकीचे नियम न पाहता व जादा प्रवासी बसवले असल्याने त्यांच्यावर कायदा कलम ६६(१)१९२ नुसार कारवाई करून कोर्टात हजर करून कोर्टाने या रिक्षा चालकांना मालकांना अकरा हजार रुपये दंड केला असल्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी सांगितले.