बेशिस्त बुलेटचालक व रोडरोमियोंवर लोणीकंद पोलिसांची कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – वाघोलीतील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये फिरणारे बेशिस्त बुलेटचालक व रोडरोमियोंवर लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई केली.

यामध्ये दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणे, सायलेन्सरचा आवाज करणे, वेगाने वाहन चालविणे, परवाना नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसविणे आदी मोटर वाहन कायदा कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतः उभे राहून पथकाच्या मदतीने कारवाई करून रोडरोमियोंना दणका दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी शाळा महाविद्यालय परिसरामध्ये अशीच कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

You might also like