… तर कारमधून विनामास्क प्रवास करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   स्वतःच्या कारमधून जरी प्रवास करत असलात तरी देखील तुम्हाला मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत. पण एकटा चालक असल्यास मास्कची आवश्यकता नसल्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, त्याला मास्क न परिधान करणे हेही एक कारण असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पोलीस व पालिकेकडून मास्कची जोरदार कारवाई सुरू आहे. पण यावेळी कारमधून प्रवास करीत असताना मास्क आवश्यक आहे काय? अशी विचारणा केली जात होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. कारमध्ये एकापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे विनामास्क प्रवास करत असल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी २ सप्टेंबरपासून विनामास्क नागरिकांविरुद्ध ५०० रुपयांची दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक चौकात विनामास्क चालकांसह नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. मात्र, मोटारीत मास्कची आवश्यकता आहे का? अशी विचारणा सातत्याने अनेकांकडून करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कारमधून एकट्या चालकाला मास्क नसल्यास कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दोनपेक्षा अधिकजणांनी प्रवास केल्यास सोशल डिस्टन्ससह मास्क लावून नियमांचे पालन करावे लागणार आहे.