मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई

शिक्रापुर : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या पसरत असलेल्या कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाची शिक्रापूर पोलीस व परिसरातील ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी सुरु केली असून त्यानुसार अनेकांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांतील ग्रामपंचायत प्रशासनाला पोलिसांनी मास्क न लावता फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत देत असल्याचे सांगत कारवाईस सुरवात करण्यास सांगितले आहे, त्यानुसार आज शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, पोलीस हवालदार संजय ढावरे यांसह ग्रामपंचायत कर्मचारी अदिनी सणसवाडी ,शिक्रापुर तळेगाव ढमढेरे,पाबळ परिसरात तोंडावर मास्क न लावणाऱ्या, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे, यावेळी कारवाई करण्यात येणाऱ्या सर्व व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे, तर प्रशासनाने सुरु केलेल्या या कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे, तर यावेळी बोलताना दररोज अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत गोळा होणारा दंड हा गावातील सार्वजनिक कामांसाठी वापरू शकता, कारवाई सुरु असलेल्या सर्व ठिकाणी पोलिसांची मदत देणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने सदर कारवाई साठी पुढे येथे गरजेचे असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like