PM मोदी आणि HM शहा यांच्याबाबत आक्षेपार्ह ‘Tik Tok’ व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाईला सध्या मोठ्या प्रमाणावर टिकटॉकची भुरळ पडली आहे. टिकटॉकवर एखाद्या चित्रपटाचा डायलॉग घेऊन व्हिडीओ बनवला जातो अनेकांना तर टिकटॉकमुळे खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. मात्र बेळगाव मधील एका तरुणाला टिकटॉकचा व्हिडीओ करणे चांगलेच महागात पडले आहे.

बेळगावच्या संकेश्वरमधल्या एका तरुणाने टिकटॉकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एक आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर काही स्थानिक हिंदुत्वादी संघटनांनी संकेश्वर येथील पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करताना बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.

अमन आवटे असे या तरुणाचे नाव असून त्याला टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा चांगलाच छंद होता. पोलिसांनी यावर कारवाई करत तरुणाची थेट हिंडलगा येथील कारागृहात रवानगी केली आहे. त्यामुळे आता टिकटॉक तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये देखील टिकटॉकवर आळंदी पॅटर्न नावाने व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे व्हिडीओ बनवण्यासाठी या तरुणांनी खऱ्या तलवारी आणल्या होत्या म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आता टिकटॉक करणे तरुणाईला चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/