Lockdown : पुणे जिल्हयात टेम्पोवर अत्यावश्यक सेवा लिहून चक्क गावठी दारूची वाहतूक

लोणी काळभोर पोलिसनामा (शरद पुजारी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लाॅकडाऊन केल्यानंतर बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद आहेत केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याचे आदेश दिले याच संधीचा गैरफायदा घेऊन अनेक जण अवैध धंदा चालवताना दिसत आहे. याचीच प्रचिती हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे आली आहे.काल शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छोटा हत्ती टेम्पोवर अत्यावश्यक सेवा दूध वाहतूक असे लिहून त्यामधून गावठी दारुची वाहतूक केली जात होती.मुळा मुळा नदीच्या काठावर वस्तीवर असलेल्या पोलिस तसेच ग्राम सुरक्षा समिती सदस्यांना ही घटना उघडकीस आणली.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्वत्र अभूतपूर्व बंदोबस्तात लाॅकडाऊन करण्यात आले आहे फक्त जीवनावश्यक वस्तूची सुविधा चालू आहे.त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेऊन अत्यावश्यक सेवा असे लिहून छोटा हत्ती टेम्पो मधून गावठी दारु वाहतूक केली जात आहे.मांजरी बुद्रुक येथे लाॅकडाऊन केल्यामुळे वस्तीवर असलेल्या पोलिस काॅन्टेबल प्रफुल्ल सुतार व ग्रामपंचायत सुरक्षा समितीचे सदस्य यांना एक टेम्पो जात असताना अडवला त्यावर त्यातील चालक व त्याचा साथीदार यांनी सुरक्षा समितीच्या सदस्यासोबत हुज्जत घालून लागले त्यावेळी सुतार यांनी पोलिस उपनिरीक्षक पडळकर यांना याची माहिती कळवली दरम्यान टेम्पोतील शुभम भास्कर झोंबाडे रा.सुखसागर नगर कात्रज व विकी सतीश गायकवाड गोकुळनगर कात्रज यांना ताब्यात घेतले दरम्यान पोलिस उपनिरीक्षक पडळकर पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे पोलिस नाईक ॠषीकेश व्यवहारे घटनास्थळी पोहोचले व टेम्पोची झडती घेतली असता त्यात पस्तीस लिटरच्या काळ्या रंगाच्या चार कॅनमधून गावठी दारु भरुन वाहतूक केली जात होती.

यात एकुण टेम्पो सह चार कॅनमधील 140 लिटर गावठी दारु जप्त केली याची साधारणपणे किंमत रु.2,05,600/- इतकी आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.राज्यातील सर्व दारुची दुकाने पूर्णपणे बंद आहेत अशावेळी तळीरामाची चांगलीच गोची झाली आहे त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन गावठी दारूच्या उत्पादनात व विक्रीत मोठी वाढ झाली आहे
त्यामुळे यावर प्रतिबंध घातला नाही तर कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.