खळबळजनक ! सोबत काढलेले फोटो देण्यासाठी 5 लाखाची मागणी अन् 2 पोलिसांमध्ये वाद, ‘तु एकटी भेट तोंडावर अ‍ॅसिड फेकतो’

पुणे (पिंपरी)  : पोलीसनामा ऑनलाइन – सोबत काढलेले फोटो देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून तू एकटी भेटल्यानंतर तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकेन अशी धमकी एका पोलिसाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिली आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला आहे. आनंदा शाहू चौहान (वय-35 रा. साईनाथनगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलिसांचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिला पोलिसाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोलीस कर्मचारी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बंदोबस्तासाठी ड्युटीवर जात होत्या. त्यावेळी पिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ आरोपीने त्यांना आडवून भरदिवसा विनयभंग केला. तू माझी झाली नाही तर, तुला कोणाचीच होऊ देणार नाही. तु फक्त एकटी भेट तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकल्याशिवाय शांत बसणार नाही अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली.

आरोपी एवढ्यावर थांबला नाही तर त्याने महिला पोलिसाला तुझ्या पतीलाही मारून टाकण्याची धमकी देली. तसेच आपल्या दोघांचे फोटो माझ्याकडे आहेत. ते सर्वांना दाखवून तुझी बदनामी करेन. तुला फोटो पाहिजे असतील तर पाच लाख रुपये दे, अशी धमकी देऊन शिवगाळ केली. तसेच त्याने महिलेचा फोटो व्हॉट्स अ‍ॅपच्या डिपीला ठेवून फिर्यादीचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोचरे करत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like