JNU घोषणाबाजी प्रकरण : कन्हैया विरोधात आरोपपत्र

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. तीन वर्षांनंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या आरोपपत्रात जेएनयूतील विद्यार्थी नेतेे कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांच्यासह १० जणांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणी सभेत किंवा भाषणात कन्हैय्या कुमार यांच्याकडून सरकार चार्जशीट कधी दाखल करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आता त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळू शकतो.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचा तब्बल तीन वर्षं तपास केल्यानंतर आज दिल्ली पोलीस पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठा आवारातील या आंदोलनासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी तब्बल ३ वर्षांनी आज दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. त्यामध्ये कन्हैयाकुमारसह १० जणांची नावे आहेत. त्यापैकी आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, और खलिद बशीर भट हे जम्मू आणि काश्मीर येथील रहिवासी आहेत.

काय आहेत आरोप ?

परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन करणे

सुरक्षा यंत्रणांनी कार्यक्रम थांबवल्यानंतरही तो सुरूच ठेवणे
या कार्यक्रमाचे नेतृत्व केल्याचा ठपका कन्हैया कुमारवर
निषेध आणि आक्रमक घोषणाबाजी करणे