गोळीबारप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

एरोली (नवी मुंबई) : पोलीसनामा ऑनलाईन – एरोली येथील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. संजय भोईर हे बाळकूमचे नगरसेवक आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री दोन टोळक्यांमध्ये झालेल्या वादातून घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरोली सेक्टर-९ मधील गरम मसाला या हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये वाद झाला होता. याच वादातून गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबारीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. दोन्ही गटात झालेल्या बाचाबाचीत अमित भोगले याने तीन राऊंड फायर केल्याचे समजते आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हॉटेलमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले. रबाळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात येत आहे. पोलिसांनी अमित भोगले व अज्ञात दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याची शक्यता असून बाळकूमचे नगरसेवक संजय भोईर यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like