Police Transfer | ‘बिग बी’ अमिताभच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसाची वर्षाला दीड कोटीची कमाई, तडकाफडकी बदली; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Police Transfer | सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि बिग बी (Big B.) म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेसाठी असेलेल्या पोलीस हवालदाराची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) असं त्या पोलीस हवालदाराने नाव आहे. हवालदार शिंदे यांची बदली करून त्यांना डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात (D. B. Road Police Station) नेमणूक केली आहे. दरम्यान, मुख्यतः म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत असताना जितेंद्र शिंदे हे करत असलेली कमाई हे बदलीचं (Police Transfer) कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

सेलिब्रटीमुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना X दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.
2 पोलीस कर्मचारी सतत त्यांच्यासोबत असतात. जितेंद्र शिंदे हे त्यापैकी एक आहेत.
शिंदे हे 2015 पासून अमिताभ यांच्या सुरक्षेत होते. कुठल्याही पोलीस कॉन्स्टेबलला 5 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale) यांनी दिल्या आहेत. यावरून ही बदली झाल्याचं म्हटलं जातं.
परंतु, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे (Police Constable Jitendra Shinde) यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला साधारण दीड कोटी रुपये मिळत होते.
अर्थात महिन्याला त्यांची कमाई बारा लाखांच्या वर होतीय.
हेच त्या बदली मागचे मुख्य कारण असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे (Police Constable Jitendra Shinde) यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. शिंदे यांची स्वत:ची खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी आहे.
त्यांची पत्नी या एजन्सीचा कारभार बघत असून सेलिब्रिटिंना या एजन्सीकडून सुरक्षा पुरवली जाते,अशी बाब पुढं आलीय.
तर, ‘शिंदे यांना आधी कारणे दाखवा नोटिस दिली जाणार असून त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतली जाणार आहे.
पोलीस कर्मचारी म्हणून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त शिंदे यांना इतर एखाद्या एजन्सीकडून पैसे मिळत होते का? याची चौकशी केली जाणार असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं असल्याचं समजते.

 

या दरम्यान, ‘नियमानुसार कुठलाही सरकारी कर्मचारी 2 ठिकाणांहून पगार घेऊ शकत नाही.
शिंदे यांनी या नियमाचा भंग केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकऱ्यानी सांगितलंय.
तसेच, अमिताभ बच्चन यांचा शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
शिंदे हे सावलीसारखे अमिताभ यांच्यासोबत असायचे.
म्हणून त्यांची बदली केली जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचं देखील कळते.

 

Web Title : Police Transfer | amitabh bachchans police bodyguard jitendra shinde transferred over rs 1 5 crore income

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Financial Tasks | सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी पूर्ण करा आपल्या पैशांशी संबंधीत ही 5 कामे, जाणून घ्या कोणती

E-Shram Card | असं तयार होतं ई-श्रम कार्ड ! ‘ही’ आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ज्यामुळं काही मिनीटांमध्येच होतंय काम; जाणून घ्या

Mysuru Rape Case | बलात्कारप्रकरणी मंत्र्याचा अजब सवाल; म्हणाले – ‘सुर्यास्तानंतर ती तिथे गेलीच का?’