पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा प्रयत्न उधळला 

विरार : पोलीसनामा ऑनलाईन

कायद्याने बालविवाह करण्यास बंदी असताना देखील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करणाऱ्या नबरोबाची वरात पोलिसांनी पोलीस ठाण्यापर्यत काढली. विरार पोलिसांना एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विवाहस्थळी जाऊन विवाह उधळून लावला. पोलिसांनी याप्रकरणी नवरदेवासह तीन जणांना अटक करुन विवाहासाठी उपस्थित असलेल्या २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c25a7b9f-bb44-11e8-b373-119ff2c386e8′]

नवरदेव वसंत राठोड (वय- २८) मुलाची आई झीमाबाई राठोड आणि मुलीचे वडील विजय जाधव (वय -४२) यांना अटक केली आहे. तसेच लग्नाच्या वेळी हजर असणाऱ्या २५ जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये कलम ९ व ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार 

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात एका अल्पयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केली. १६ वर्षीय मुलीचे २८ वर्षीय तरुणासोबत लग्न लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की

या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव वसंत राठोड, त्याची आई झीमाबाई राठोड आणि मुलीचे वडील विजय जाधव  यांना अटक केली आहे. तसेच लग्नाच्या वेळी हजर असणाऱ्या २५ जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार कलम ९ व ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींवर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली.

[amazon_link asins=’B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e452020f-bb44-11e8-9410-53851bf0d160′]

आम्हाला या बालविवाहाबाबत माहिती मिळताच आम्ही जाऊन कारवाई केली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला अशी माहिती विरारचे उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी दिली. आरोपी हे वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिव बाग येथील बंजारा वसाहतीत राहतात. मुलीच्या मर्जीविरोधात हे लग्न लावून देण्यात येत होते.