वारी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – आषाढी वारीचा बंदोबस्त संपवून परतत असताना पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात जेजुरी जवळील तक्रारवाडी येथे झाला. निलेश दत्तात्रय निगडे (रा. गुळुंचे ता. पुरंदर) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आषाढी वारीचा बंदोबस्त उरकून येत असलेल्या ठाणे शहर पोलीसांच्या गाडीचा जेजूरी जवळील तक्रारवाडी येथे भिषण अपघात झाला. पोलिसांची व्हॅन पुणे पंढरपूर पालखी माहामार्गावरून पुण्याकडे येत होती. जेजुरी जवळ आल्यानंतर समोरुन येणाऱ्या पिकअप वाहनाची धडक पोलीस व्हॅनला बसली. या अपघातात पोलीस व्हॅनचे चालक निगडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जेजुरी येथे प्राथमिक उपचार करून पुणे येथे हलवण्यात आले.

हा अपघात सोमवारी रात्री झाला. पोलीस व्हॅन आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात येवढा जोरदार होता की त्यात जीपचा चेंदामेंदा झाला आणि पोलीस व्हॅनचंही मोठं नुकसान झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like