पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले, संतप्त जमावाची दगडफेक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

वेणी गणेशपूर गावाजवळ पोलिसांच्या गाडीने ६ जणांना चिरडले. या भीषण अपघातानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. हे वाहन मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याचे आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b44e9549-d02b-11e8-85bb-9b57687ffeb4′]

या अपघातात विनोद भलावी (३५), समिन शेन्डे (१०), तनुजा वास्नीक (१३), योगेश पाडव (२०), नामदेव खंडारे (३९) आणि पोलीस कॉनस्टेबल एकनाथ आगासे (५४) हे सर्व जखमी झाले असून त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B073QSPJZS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bec3e373-d02b-11e8-af8d-1ff5765ec12b’]

मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली : जिल्ह्यातील पळसगाव येथे मळणी यंत्रात सोयाबीन टाकताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अशा प्रकारे शेतकऱ्याचा मृत्यू होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. विश्वनाथ व्यंकटराव कराळे (२५ वर्षे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यास वीस गुंठे शेती आहे. यंदा शेतातून उत्पन्न न आल्याने ते रोजंदारीवर काम करत होते. सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे. गावातीलच प्रल्हाद पाणघोडे यांच्या शेतात सोयाबीन टाकत असताना, विश्वनाथ कऱ्हाळे यांचा तोल गेल्याने ते मळणी यंत्रात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. विश्वनाथ कऱ्हाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई -वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी वसमत येथील ग्रामीण पोलीस मृत्यूची नोंद केली आहे.

धक्कादायक…. एसएनडीटी हॉस्टेलमध्ये वॉर्डनने विद्यार्थिनीला नग्न केले

Loading...
You might also like