सर्वाधिक रक्‍कमेचा दंड आकारताना ‘घोड’चूक, पावतीवर पैसे देणार्‍याचं नाव लिहीलं ‘भगवान राम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक २०१९ लागू झाल्यापासून वाहतुकीचे नवीन नियम लागू झाले आहे. नवीन नियम अतिशय कडक आणि दंडाच्या रकमा जास्त असल्यावरून लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता. त्यात पोलिसांकडून होत असलेल्या चुकांच्या एकाहून एक भन्नाट बातम्या समोर येत आहेत.

काही ठिकाणी तर कार चालवताना हेल्मेट का वापरले नाही म्हणून पोलिसांकडून दंड लावला गेल्याची बातमी समोर आली आहे. तर आणखी काही विचित्र प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. राजस्थान मधील बिकानेर आरटीओ मध्ये एका ट्रक मालकाचे भरलेल्या चालान वर त्याचे नावच चुकीचे लिहिले गेले आहे.

सबसे बड़े चालान में बड़ी गलती, रसीद में जमाकर्ता का नाम कर दिया 'भगवान राम'

पोलिसांकडून झाली चूक, दंड भरणाऱ्याचे नावच चुकीचे लिहिले गेले 
आत्तापर्यंत च्या सर्वात मोठ्या चालान मध्ये ट्र्क मालकाचे नाव हरमन राम असे आहे. त्या ठिकाणी पोलिसांकडून भगवान राम असे लिहिले गेले आहे. ट्रक मालकाने दिल्लीमधील रोहिणी कोर्टात १,४१,७०० रुपयांचे चालान जमा केले आहे. या ट्रकला ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये ओव्हरलोडींग साठी ७० हजार रुपयांचे चालान केले गेले होते. ट्रक मध्ये अतिरिक्त माल भरला गेला असल्यामुळे ट्रक मालकाला सुद्धा ७० हजार रुपयांचे चालान केले गेले होते.

ट्रक मालकाने सांगितल्यानुसार याच्या व्यतिरिक्त आणखी १,७०० रुपयांचे चालान केले गेले होते. चालान ची पूर्ण रक्कम १ लाख ४१ हजार ७०० रुपये झाली होती.  ९ सप्टेंबर रोजी हरमन राम यांनी चालानची रक्कम रोहिणी कोर्टात जमा केली आहे. पैसे भरणाऱ्याचे नाव भगवान राम लिहिले गेले आहे. परंतु आरटीओ बिकानेर मधून भेटलेल्या माहितीनुसार ट्रक नोंदणी नंबर RJ07 GD 0237 च्या मालकाचे नाव हरमन राम असे आहे.

नियमांची योग्य माहीती नसल्यामुळे वाहन चालक अडचणीत 
नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी १ सप्टेंबर पासून देशभर लागू झाली आहे. तेव्हा पासुन एकाहून एक नव नवीन प्रकार बाहेर येत आहेत. एखाद्याला २५ हजार रुपयांचा दंड आकारला गेल्याची बातमी तर दुसऱ्या एकाला ६० हजार रुपयांचा दंड आणि आता तर दिल्ली मधील रोहिणी कोर्टात एका ट्रक मालकाने १,४१,७०० रुपये दंड भरला असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात दंड जमाकर्त्याचे नाव चुकीचे लिहिले गेले आहे. वाहतुकीचे नवीन नियम लागू होऊन आता १० दिवस लोटले आहेत. वाहन चालकांना नवीन नियमांची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत.
नवीन नियमांमुळे भराव्या लागणाऱ्या रकमांचे प्रमाण वाढले 
मुळात प्रश्न असा आहे की, वाहन चालकांना काय करावे आणि काय करू नये हेच समजत नाहीये. वाहतूक पोलीस नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करत आहेत. नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्यांअंतर्गत लायसन्स नसताना गाडी चालवल्यास ५,००० रुपयांपर्यंचे चालान लागत आहे. नवीन नियमांनुसार चलनांच्या रकमांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागांमधून मोठ-मोठ्या रकमांचे चालान काटले जात आहेत. असाच एका प्रकारात चालान काटले गेल्यामुळे दिल्लीमध्ये एका तरुणाने आपली मोटारसायकल पेटवून दिली होती.
नवीन नियमानुसार वाहतुकीचे नियम भंग केल्यास दंडाच्या रकमा अतिशय वाढवल्या गेल्या आहेत. त्याचा सामान्य लोकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये वाहतूकीच्या नवीन नियमांबाबत नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
You might also like