3 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अमरावती शहर पोलीस दलातील पोलीस शिपायास 3 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

सुशील सुरेशराव गुल्हाणे (वय 41) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सुशील हे अमरावती पोलीस दलात कार्यरत आहेत. यातील तक्रारदार महिलेचा जावई व त्यांचे मोठे भाऊ यांच्यावर धारणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रिपोर्ट न वाढवता सहकार्य करण्यासाठी सुशील गुल्हाने यांनी त्यांच्याकडे 4 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज एसीबीच्या पथकाने सुशील याना तडजोडी अंती 3 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.