संतापजनक ! अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, सोलापूर जिल्ह्यातील घटना

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. मात्र रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशातच माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला मळोली येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलीस ठाण्यातील साळमुख बिट अंमलदारास मदतनीस म्हणून नेमणूकीस असलेला कर्मचारी जावेद नजीर जमादार हे मळोली गावात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव याने कारमधून येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच काही दिवसांपूर्वी साळमुख येथील भावाचे हॉटेलमध्ये तपासणी कल्याचा राग मनात धरून मंगळवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास मळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लाथा बुक्यांनी मारहाण केली.

त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने हातावर आणि तोंडावर वार करून जखमी कले. एवढेच नाही तर जावेद जमादार यांचा मोबाईल फोडून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वेगवेगळ्या कलमान्वये वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी अरुणसिंह जाधव याला अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी दिली. पुढील तपास वेळापूर पोलीस करत आहेत.